Wednesday, August 14, 2013

आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..?


आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..?
येत्या चोवीस तासात भरपूर जणांचे देशप्रेम उफाळून येणार आहे..आपण भारतीय असल्यची आठवण काही तासंपुरती का होईना प्रत्येकाला होणार आहे..सुमारे सहासष्ट वर्षांपूर्वी  आपला देश परकीयांचे पारतंत्र्य भोगीत होता. सत्तेचाळीस साल उजाडलं व भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक विचार मनास चटकन शिवून गेला , की आपण आज खरोखरच स्वतंत्र झालो आहोत काय..? आणि दुसाऱ्या क्षणी मनाने ताबडतोप उत्तर दिलं,  “बा भारतीया, तू इंग्रजांच्या भौतिक स्वातंत्र्यातून स्वतंत्र झाला असशीलही पण आजही त्यांच्याच वैचारिक पारतंत्र्यात वावरतो आहेस.यात तुझी चूक मुळीच नाही. आज तुला ता गोष्टीचा फारच पश्चात्ताप वाटत असेल तर हा विषमज्वरही तुला फार उशिरा आल्यामुळे त्याचा काही एक उपयोग नाही.”
आपण खरोखर स्वतंत्र झालो आहोत काय..? आपण परकियांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असताना कधी हा विचार केला आहे का..? मला तर वाटते आपण आजही पारतंत्र्यातच आहोत पण ते स्वकीयांच्या.. एक वेळ इंग्रज परवडले पण आजचे राज्यकर्ते नकोत असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत आपण हतबुद्ध होवून बसलो आहोत म्हणजे आपण नक्की पारतंत्र्यातच आहोत. आम्हाला आमचे स्वतंत्र विचार नाहीत.. आम्ही बोलतो ती भाषा परक्यांची..आम्ही घालतो ते वेष परक्यांचे.. आम्ही पाहतो ते चित्रपट विदेशी..आम्ही खातो खाद्य चायनीज..आम्ही घेतो ते उपचार अॅलोपॅथिक..नेमकं झालंय तरी काय आम्हाला आज..? की उच्चार आणि आचाराप्रमाणे विचारांच्या बाबतीतही आम्ही पुरते पारतंत्र्यातच आहोत..?
आजघडीला देशाची वैचारिक, बौद्धिक, मानसिक, धार्मिक,  राजकीय, सामाजिक, आर्थिक, व आंतरराष्ट्रीय परिस्थिती उघड्या डोळ्यांनी बघितली तर असं वाटतं की आम्हाला डोळे असून दृष्टी  नाही.. कान असले तरी काळाची हाक ऐकू येत नाही..जीभ असून वाचा बंद पडली आहे..आणि हातपाय असूनही आमची पंगुवत अवस्था झाली आहे. आज ६६ वर्षे झाली तरी स्वातंत्र्य हा पदार्थ नेमका कशासोबत खातात हे अजून आम्हाला नीट उमगले आहे असे वाटत नाही. हीच गोष्ट भारत सोडताना ब्रिटीशांचा व्हाइसराय पंचम जॉर्ज आपल्या निवेदनात ठळकपणे अधोरेखित केली होती. “आम्ही भारताला स्वातंत्र्य देत आहोत परंतु स्वातंत्र्य उपभोगायला भारत समर्थ आहे असे आम्हास वाटत नाही. तेंव्हा स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा हे शिकण्यासाठी तरी त्यास आमच्यावरच विसंबून राहावे लागेल ”, असे तो म्हणाला होता. त्याचे म्हणणे खरेही होते म्हणा..!!
कारण स्वतंत्र भारताची राज्यघटना तरी कुठे पुरती स्वतंत्र होती..?नाही तरी चार घरी जोगवा मागून त्या पिठाची भाकरी मळावी आणि ती  एक नवीन पाककृती आहे असे सांगत तिच्या निर्मितीचे अख्खे श्रेय लाटावे तशी भारतीय राज्यघटना लाटून तिच्यावर स्वतःची भाकरी भाजून घेणारे शिल्पकार भारतातच सापडायचे..!! आता वरचे कव्हर तेवढे आपले व  आत कायदेच जर त्यांचे असतील तर ते आंमलात आणायची अक्कलही आम्हा बापड्या भारतीयांत कोठून असावयाची..? तिथेच सारे नडत आले. मग शतकानुशतके फक्त मोगल, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटीश, इत्यादींमुळे जडलेल्या पारतंत्र्याच्या जुनाट व बळावलेल्या अजारावर उपचारापोटी दिलेली स्वातंत्र्याची मात्रा तरी आमच्या प्रकृतीस एकदम कशी मानवणार ? रोग बरा होण्यासाठी आधी औषध लागू पडावे लागते, नसता औषधाचीच रिअॅक्शन येते.. 
आज आम्ही उपभोगीत असणारे स्वातंत्र्य हे अशीच एकप्रकारची रिअॅक्शन असली पाहिजे..!! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक विचार मनास चटकन शिवून गेला , की आपण आज खरोखरच स्वतंत्र आहोत काय..? आणि दुसाऱ्या क्षणी मनाने ताबडतोप उत्तर दिलं,  “बा भारतीया, तू इंग्रजांच्या भौतिक स्वातंत्र्यातून स्वतंत्र झाला असशीलही पण आजही त्यांच्याच वैचारिक पारतंत्र्यात वावरतो आहेस.यात तुझी चूक मुळीच नाही. आज तुला ता गोष्टीचा फारच पश्चात्ताप वाटत असेल तर हा विषमज्वरही तुला फार उशिरा आल्यामुळे त्याचा काही एक उपयोग नाही.

No comments:

Post a Comment